ताज्या बातम्यारणधुमाळी

“प्रत्येक कॅबिनेटमध्ये झोपा काढणारा माणूस…”,सामंत हल्ला प्रकरणावरून रामदास कदमांची टीका

मुंबई | Ramdas Kadam On Subhash Desai – शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर काल (2 ऑगस्ट) पुण्यातील कात्रज परिसरात हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. हा हल्ला शिवसैनिकांनी केला असल्याचं शिंदे गटाचं मत आहे. तसंच सामंत यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करतानाच हा हल्ला म्हणजे उस्फुर्त प्रतिक्रिया होती असं मत शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं. याच वक्तव्यावरुन शिंदे गटाला समर्थन करणाऱ्या रामदास कदम यांनी सुभाष देसाईंवर टीका केली आहे.

यावेळी रामदास कदम म्हणाले, “काही लोकांच्या हातात काहीच नाही तेवढं काम आमच्या हातात आहे. मला वाटतं उदय सामंत असो, एकनाथ शिंदे असो किंवा इतर आमदार असो, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊ नये त्यांनी फक्त आपल्या मतदारसंघाचा विकास, महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्रातील शेतकरी, आदिवासी, मागासलेपण या गोष्टी डोळ्यासमोर ठेवाव्यात. आपण आपल्या कामाला लागावं.”

“शिवसेनाप्रमुखांची आम्हाला शिकवणच आहे. अंगावर आले तर शिंगावर घ्या, तो भाग वेगळा आहे. आमच्यासाठी हे काही नवीन नाही. अशापद्धतीने भ्याडपणे हल्ला करणं योग्य नाही. हाताला दगड बांधायचे, काचा फोडायच्या हे काही मर्दुमकीचं लक्षण नाही,” असा टोला देखील रामदास कदम यांनी लगावला.

तसंच रामदास कदम यांनी यावेळी सुभाष देसाई यांनाही लक्ष्य केलं. “सुभाष देसाई म्हणजे फार झंझावात आणि वाघासारखे नेते. त्यांची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्राने जवळून पाहिली आहे. पहिल्यांदा त्यांनी तोंड उघडलं याचं मला आश्चर्य वाटतंय. प्रत्येक कॅबिनेटमध्ये झोपा काढणारा माणूस आता जागा झालाय आणि बोलतोय याचं मला आश्चर्य वाटतंय,” असंही रामदास कदम म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये