क्रीडाताज्या बातम्यापुणे

पुणे फेस्टिव्हलमध्ये स्पर्धांची रेलचेल

पुणे : यंदा ३४ वा पुणे फेस्टिव्हल ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. त्यामध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये मिस पुणे फेस्टिव्हल, चित्रकला, नृत्याविष्कार, पाककला, मंगळागौरीचे खेळ, गायन, अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. तसेच केवळ महिलांसाठी लावणी कार्यक्रमही आहे. यंदाही महिलांच्या विविध स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास पुणे फेस्टिव्हलतर्फे डॉ. सतीश देसाई यांनी व्यक्त केला.
‘मिस पुणे फेस्टिव्हल’ ही तरुणींमध्ये लोकप्रिय स्पर्धा पुणे फेस्टिव्हलमध्ये श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होईल. स्पर्धेचे यंदाचे ८ वे वर्ष आहे. ही महिलांचे व्यक्तिमत्त्व आणि सौंदर्य यावर आधारित असून, १८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणींसाठी आहे. याचे संयोजन सुप्रिया ताम्हाणे यांनी केले असून, अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट आहे.

आकृती ग्रुपतर्फे महिलांसाठी पोर्ट्रेट व कंपोझिशन अशी चित्रकला स्पर्धा बालगंधर्व कलादालन येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे १३ वे वर्ष असून, स्पर्धेचे आयोजन अॅड. अनुराधा भारती यांनी केले आहे. या स्पर्धेची अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट आहे. याशिवाय “गाऐ लता” हा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतीस मानवंदना नृत्य, चित्रकला व संगीत यातून पुण्यातील नामवंत गायिका काही अवीट गाणी सादर करणार असून, सर्व महिला कलाकारांचा समावेश आहे.

महिलांची पाककला स्पर्धा म्हात्रे पूल जवळील विष्णूजी की रसोई” येथे आयोजित करण्यात आली आहे. गोड चिरोटे करणे आणि घरून तिखट कोफ्ता करी करून आणणे अशी ही स्पर्धा असून, दिनांक ३० ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. याच काळात मंगळागौरीचे खेळ आणि सांघिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले अाहे. नृत्य स्पर्धा यशवंतराव चव्हाण सभागृह, कोथरूड येथे संपन्न होईल. २० ते ३५ व ३६ ते ५० वर्षे या वयोगटासाठी स्पर्धेची प्रवेशिका स्वीकारण्याची तारीख ३० ऑगस्ट असेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये