पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

सैनिक मित्रपरिवार, दगडूशेठ ट्रस्टचा उपक्रम

सैनिकांना पाठविण्यात येणाऱ्या २१ हजार राख्यांचे पूजन

ज्यावेळी सैनिक सैन्यदलात भरती होतात, त्याचवेळी त्यांना अदृश्य स्वरुपात राखी बांधली जाते. रक्षाबंधन हा प्रेम व आपुलकी दर्शविणारा सण असून राखी हा प्रेमाचा रेशीम धागा आहे. त्यामुळे सर्वांमधील राष्ट्रभक्ती प्रेरित करण्याकरिता असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे.
— वीणा फडके, ज्येष्ठ अभिनेत्री

पुणे : देशाच्या सीमेवर सैनिक लढत असतात, म्हणून आपण सुखरुप राहू शकतो. एखाद्या मंदिरात जाऊन आपण परमेश्वराचे दर्शन घेतो. हे जसे पवित्र कार्य आहे, तसेच सैनिकांना राखी पाठविणे हेदेखील तितकेच पवित्र कार्य आहे. सैनिकांची आठवण आपल्याला संकटकाळी होते. महिलादेखील सैन्यात दाखल होऊन देशासाठी लढत आहेत, हेदेखील मोठे काम आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. माधवी वैद्य यांनी व्यक्त केले. सैनिक मित्रपरिवारतर्फे आणि कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या सहकार्याने बुधवार पेठेतील मंदिराच्या सभामंडपात सैनिकांना पाठविण्यात येणाऱ्या २१ हजार राखीपूजनाचा कार्यक्रम झाला.

यावेळी निवृत्त मेजर आशा शिंदे, ज्येष्ठ अभिनेत्री वीणा फडके, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालिका सीमा कांबळे, नगरसेविका वनिता वागस्कर, विश्वेश्वर बँकेच्या व्यवस्थापिका राखी कोकाटे, संपदा सहकारी बँकेच्या संचालिका प्रा. संगीता मावळे, लोकमान्य सोसायटीच्या शाखा व्यवस्थापक गायत्री चौगुले, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड. रजनी उकरंडे, युवराज गाडवे, राजू बलकवडे, अक्षय हलवाई, आनंद सराफ, कल्याणी सराफ आदी उपस्थित होते.

उपस्थितांच्या हस्ते राखीपूजन झाले. उज्ज्वला सावंत, आरती भिसे, राजू बलकवडे, सारंग सराफ आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य केले. लायन्स व रोटरी क्लबच्या अनेक शाखांसह, पुण्यातील ५० हून अधिक सामाजिक संस्था, संघटनांनी या उपक्रमात सहभाग घेत राख्या दिल्या आहेत.

आनंद सराफ म्हणाले, सन १९९७ पासून सलग हा उपक्रम सुरू आहे. राखी पौर्णिमेनिमित्त देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी सैनिक मित्रपरिवारातर्फे पुणेकरांच्या १ लाखांपेक्षा जास्त राख्या पाठविण्यात येणार आहेत. तसेच सैनिकांसाठी विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे, पत्रे व राख्या पाठविण्यात
येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये