“मला तुझं वेड आहे…”,पत्नी जेनेलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने दिल्या खास शुभेच्छा!

मुंबई | Ritesh Deshmukh Birthday Wishes To His Wife Genelia – जेनेलिया आणि रितेश देशमुख यांची जोडी बाॅलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. या दोघांनी 2012 मध्ये लग्नगाठ बांधली होती. तसंच रितेश आणि जेनेलिया हे दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. रितेश हा नेहमी त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. तसंच आज जेनेलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेशने एक हटके पोस्ट शेअर केली आहे.
रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. जेनेलियाच्या वाढदिवसानिमित्त त्यानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत त्याने एक मजेशीर व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत तो समोसा आणि मुलींचं वय याबद्दल बोलताना दिसत आहे. तसंच या व्हिडीओसोबत रितेशनं जेनेलियासाठी छान कॅप्शन देखील दिलं आहे.
“आज मी सकाळी उठलो तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढल्याचं जाणवले आणि त्यासोबत एक हसू होतं जे मला चेहऱ्यावरुन पुसून टाकता येत नव्हतं. त्यावेळी बाहेर पाऊस पडतो आणि का, कोण जाणे आकाशालाही माहिती असावं की आजचा दिवस फार खास आहे. माझी सर्वात चांगली मैत्रीण, माझी जोडीदार, माझी जीवनसाथी, माझी समीक्षक आणि माझी सर्वात मोठी चेअरलीडर जिनिलिया देशमुख हिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
काही लोक प्रेमात वेडी होतात, काही वेड्यासारखी प्रेम करतात… मला तुझं वेड आहे. जेनेलिया तू माझे कायमस्वरुपी असणारे प्रेम आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा”, अशा खास शब्दात रितेशनं जेनेलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.