ताज्या बातम्यामनोरंजन

प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

मुंबई | Pradeep Patwardhan – प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते 65 वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी आज (9 ऑगस्ट) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रदीप यांनी आत्तापर्यंत अनेक मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरूची मावशी’ हे त्यांचं प्रचंड गाजलेलं नाटक आहे.

प्रदीप पटवर्धन यांनी 1985 साली आलेल्या सुयोग निर्मित ‘मोरूची मावशी’ या नाटकात अभिनेता प्रशांत दामले यांच्याबरोबर भूमिका केली होती. या नाटकातील भूमिकेनं त्यांना खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली. तसंच त्यांनी चश्मे बहाद्दर, लावू का लाथ, नवरा माझा नवसाचा, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, गोळा बेरीज, एक शोध, जमलं हो जमलं, नवरा माझा भवरा अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

दरम्यान, प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक कलाकार याबाबत हळहळ व्यक्त करत आहेत. मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. “प्रदीप पटवर्धन, भावपूर्ण श्रद्धांजली”, असं ट्विट रेणुका शहाणे यांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये