ताज्या बातम्यामनोरंजन

“मला खात्री होत नाही तोपर्यंत…”, रश्मिका मंदानाने केला विजय देवरकोंडाशी असलेल्या नात्याबद्दल खुलासा

मुंबई | Rashmika Mandanna Breaks Silence On Relationship With Vijay Deverakonda – नॅशनल क्रश आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असते. ती ‘पुष्पा’ चित्रपटानंतर आता ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून ती चित्रपटांसह विविध कारणांमुळे चर्चेत आहे. रश्मिका ही अभिनेता विजय देवरकोंडासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातं. अनेकदा ते दोघेही एकत्र दिसतात. नुकतंच रश्मिकाने विजय देवरकोंडाबद्दलच्या नात्यावर खुलासा केला आहे.

“कधी कधी मला असं वाटतं की मी वर्षातून पाच चित्रपट करते आणि तुम्ही येता आणि मला विचारता की मी कोणाला डेट करत आहे. तसंच माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे, याबद्दल तुम्हाला विचारायचं असतं. पण मला आता समजलं आहे की आम्ही कलाकार आहोत. त्यामुळे आमच्याबद्दल सतत चर्चा होत असतात आणि लोकांना आमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं”, असं रश्मिका म्हणाली.

पुढे ती म्हणाली, “जेव्हा तुम्ही माझ्या कामाबद्दल बोलता तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते. मी कोणता चित्रपट करत आहे, तो कधी प्रदर्शित होणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगू शकते. पण मला माझ्या खासगी आयुष्याबद्दल काहीही सांगायचं नाही. मी असं म्हणत नाही की मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही सांगायचं नाही. पण जोपर्यंत मला एखाद्या गोष्टीबद्दल खात्री होत नाही. मी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी याबद्दल बोलणार नाही.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये