संजय शिरसाटांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

औरंगाबाद : (Sanjay Shirsat On Uddhav Thackeray) शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे शिरसाट नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून उल्लेख केला आहे तर, त्यासोबत ठाकरेंचा जुना विधानसभेतील भाषणाचा व्हिडीओ देखील जोडला आहे.
दरम्यान, औरंगाबाद पश्चिमचे बंडखोर आमदार संजय शिरसाट पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतणार की काय? अशा चर्चेला उधाण आलं होतं. मात्र हे तांत्रिक आडचणींमुळे उद्धव ठाकरेंचा ‘कुटुंबप्रमुख’ असा उल्लेख झाला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
शिरसाट म्हणाले, आम्ही सर्व आमदार आजही शिवसेनेत आहोत. जो आमचा नेता असतो तो आमचा कुटुंबप्रमुख असतो. बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब आमचे कुटुंबप्रमुख आहेत. आम्ही उद्धव ठाकरे यांना नेहमीच कुटुंबप्रमुख मानत आलो आहोत. आम्ही आमच्या भूमिकेवर आणि ते त्यांच्या भूमिकेवर तटस्थ राहिले, म्हणत ट्वीट डिलीट केल्याचे त्यांनी सांगितले आहे.