ताज्या बातम्यारणधुमाळी

“काँग्रेसच्या नेत्यांनी आता हॅलो ऐवजी ‘जय बळीराजा’ म्हणा”

मुंबई | Nana Patole Announce Of Jay Baliraja Instead Of Hello- काँग्रेस कार्यकर्त्यांनी संवाद साधताना जय बळीराजा म्हणावं अशी सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्यापासून राज्यात नव्या वादाला सुरूवात झाली आहे.

स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवानिमित्त सुधीर मुनगंटीवर यांनी ही घोषणा करताच विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. याच दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना हॅलो ऐवजी जय बळीराजा म्हणा अशी सूचना दिली आहे.

वंदे मातरम् आमचा स्वाभिमान पण बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. वंदे मातरम् ला आमचा विरोध नाही. मात्र, जय बळीराजा म्हणणं यामागे आमची शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. बळीराजा हा देशाचा पोशिंदा आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही जय बळीराजा म्हणणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये