ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशामुळे आमिर खानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई: Due to the failure of Lal Singh Chadha, Aamir Khan took a big decision – बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. आमिरचा हा बहुचर्चित चित्रपट 11 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. मात्र प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाबाबत नकारात्मक चर्चा सुरु होत्या. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबाबत तर आमिरने स्वतः प्रतिक्रिया दिली होती. सोबतच चित्रपट पाहण्यासाठी देखील त्याने प्रेक्षकांना आवाहन केलं. मात्र या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

आमिरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. ‘लाल सिंग चड्ढा’मुळे आमिरला मोठा धक्का बसला आहे. त्याने चित्रपटाला मिळालेलं अपयश पाहता मोठा निर्णय घेतला आहे. बरीच वर्ष एकाच चित्रपटावर काम करुन देखील मिळालेलं अपयश पाहून आमिर निराश झाला आहे.

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, आमिर आणि त्याची पहिली पत्नी किरण रावच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं आहे की, “प्रेक्षकांनी ‘लाल सिंग चड्ढा’ला नाकारल्यामुळे आमिरला मोठा धक्का बसला आहे. या चित्रपटासाठी त्याने बरीच मेहनत घेतली होती. चित्रपटाला मिळालेल्या अपयशाची जबाबदारी त्याने स्वतः घेतली आहे. तसंच यामुळे चित्रपट वितरकांची नुकसान भरपाई तो स्वतः करणार असल्याचा निर्णय आमिरने घेतला आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये