ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

अमोल मिटकरींचा भगतसिंग कोश्यारींवर निशाणा; म्हणाले, “‘राज्यपाल’ ह्या पदाला…”

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी प्रलंबित आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने 12 आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. मात्र कोश्यारी यांनी संबंधित यादीवर अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं अनेकदा राज्यपालांची भेट घेऊन, संबंधित यादी मंजूर करण्याची मागणी केली होती. पण राज्यपाल महोदयांनी महाविकास आघाडी सरकारकडून दिलेली यादी मंजूर केली नाही. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. 

अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, राज्यपालांनी आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या बाजुने घेतलेल्या भूमिका पाहता, ते अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भाजपाकडून दिलेल्या 12 विधान परिषद आमदारांची यादी मंजूर करतील यात शंका नाही. शेवटी त्यांनी पक्षादेशापुढे ‘राज्यपाल’ पदाला महत्त्व द्यायचं नाही, असं ठरवलं असावं, असा खोचक टोला मिटकरी यांनी लगावला आहे.

दरम्यान, उद्यापासून महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी हे ट्वीट केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये