राष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

लवकरच दोन स्टेशनमधून धावणार मेट्रो

पुणे:राज्यातील मुख्य शहरांमध्ये आता मेट्रोचे जाळे निर्माण केले जात आहे. त्या अनुषंगाने कामही सुरू आहे. पुणे तिथे काय उणे याप्रमाणे शहरातील विविध भागात मेट्रोचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने शहरातील दोन मेट्रो स्टेशनवरील रन यशस्वी झाला आहे. 

प्रशासनाने ठरवून घेतलेल्या वेळेत हा रन झाला. गरवारे कॉलेज ते डेक्कन आणि फुगेवाडी ते दापोडी मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अल्पावधीतच या स्टेशनहून मेट्रो धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या पहिल्या ट्रायल रन चाचणीला मोठे यश मिळाले आहे.

दुसरीकडे पुणे मेट्रोने प्रवासी संख्येचाही यशस्वी टप्पा ओलांडला आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी ७० हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केल्याचे समोर आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये