ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

…म्हणून; अनिल परबांचे रिसॉर्ट पाडायला गेलेले, किरीट सोमय्या परतले रिकाम्या हाती!

मुंबई : (Kirit Somaiya On Anil Parab) काही दिवसांपुर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना नेते अनिल परब यांचा दापोली येथिल साई रिसाॅर्ट पाडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर आज सकाळपासूनच सोमय्यांनी आपण दापोलीला रिसाॅर्ट पाडण्यासाठी जात असल्याचे माध्यमांना माहिती दिली होती. त्यांचा हा आक्रमकपणा पाहून एक वेळ असे वाटले की ते खरचं रिसाॅर्ट पडणार आहेत.

मात्र, झाले असे परब यांच्या कथित साई रिसाॅर्टवर किरीट सोमय्या पोहचलेच नाही. तोडक कारवाईबाबत ग्रामसंचायत अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तराने आपले समाधान झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आपण रिसाॅर्टवर जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा शिवसेनेच्याच मात्र, अनिल परब यांच्याऐवजी सचिव मिलिंद नार्वेकर यांनी पाडलेल्या बंगल्यावर जाणार असल्याचे सोमय्यांनी जाहीर केलं.

परबांच्या रिसाॅर्टवर तोडक कारवाई प्रशासनाने करावी यासाठी सोमय्या यांनी दापोली गाठली खरी, मात्र त्यांना रिकाम्या माघारी फिरावे लागले. यावेळी त्यांनी खेड ते दापोली असा पायी दौराही काढला. काही ठिकाणच्या सभांमध्ये त्यांनी भाषण करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अनिल परब यांच्यावर हल्लाबोलही चढवला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये