ताज्या बातम्यारणधुमाळी

“माझ्या विरूद्ध कितीही चौकशी लावा, कितीही खोदा मात्र…”, एकनाथ खडसेंचा भाजपला टोला

जळगाव | Eknath Khadse On Bjp – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहेत. पण माझ्या विरूद्ध कितीही चौकशी लावा आणि कितीही खोदा काहीच मिळणार नाही, असा टोला एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावला आहे. जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला.

यावेळी एकनाथ खडसे म्हणाले, “कितीही खोदा मात्र काही मिळणार नाही, सरळ लढू शकत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहेत. आता सीबीआय चौकशी सुरू केली आहे. सगळ्या चौकशा लावल्या आहेत, जर काही केलं नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. मी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार केला नाही, केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे”.

कार्यकर्ते आणि नेते जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत संघटना मजबूत होत नाही. पाया मजबूत झाला तर निवडणुंकामध्ये यश मिळेल, असंही एकनाथ खडसे म्हणाले. तसंच यावेळी खडसे यांनी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या संवाद यात्रेचा उद्देश देखील स्पष्ट केला. त्याचबरोबर गटबाजीवरही खडसेंनी भाष्य करत जिल्हाध्यक्ष बदलावा किंवा नाही यावर मी बोलणार नाही, असं सांगितलं.  

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये