ताज्या बातम्यारणधुमाळी

“काय ते मंत्री? काय त्यांचे नाव? आणि काय त्यांचा…”, अमोल मिटकरींचा तानाजी सावंतांना टोला

मुंबई | Amol Mitkari On Tanaji Sawant – सध्या शहाजीबापू पाटील यांचा ‘काय झाडी…काय डोंगार…काय हाटेल’ हा संवाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसंच त्यांच्या या संवादाचा उपयोग राजकीय वर्तुळात देखील एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी होताना दिसत आहे. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील हाच संवाद वापरून शिंदे सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांना टोला लगावला आहे.

अमोल मिटकरींनी एक खोचक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुणे दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका शेअर केली आहे. यामध्ये तानाजी सावंत यांच्या 26 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट यादरम्यानच्या पुणे दौऱ्याचं नियोजन नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये तानाजी सावंत 26 तारखेला दुपारी अडीच वाजता मंत्रालयातून पुण्याच्या दिशेने निघाले असं नमूद करण्यात आलं आहे. मात्र, त्यानंतर 27 आणि 28 ऑगस्ट या दोन दिवसांत तानाजी सावंत यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये फक्त निवासस्थान ते कात्रज, बालाजी नगर येथील कार्यालये असाच प्रवास नमूद करण्यात आला आहे.

अमोल मिटकरींनी तानाजी सावंत यांच्या या दौऱ्याच्या नियोजन पत्राचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की, “हे आहेत आमचे आरोग्यमंत्री! एकट्या पुणे शहरात एकाच दिवसात हजारो किलोमीटरचा दौरा करण्याचा नवा विक्रम!! काय ते मंत्री? काय त्यांचं नाव? आणि काय त्यांचा दौरा? एकदम ओक्के ओक्के”, असं आपल्या ट्विटमध्ये मिटकरींनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये