‘किसी का भाई किसी की जान…”, सलमान खानची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मुंबई | Salman Khan’s Post In Discussion – बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान हा नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असतो. आता देखील तो चर्चेत आला आहे. त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली असून त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. सलमान खानने करिअरची 34 वर्ष इंडस्ट्रीत पूर्ण केली आहेत. 22 ऑगस्ट 1988 साली सलमान खानचा ‘बीवी हो तो ऐसी’ हा चित्रपट रिलीज झाला होता. तसंच आता तब्बल 34 वर्ष दबंग खानला बॉलीवूडमध्ये झाली आहेत. या 34 वर्षात सलमान खानने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. या खास क्षणी सलमान खाननं एक पोस्ट शेअर केली आहे.
सलमान खानने नुकताच ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याच्या सुरुवातीला सलमान खानने लिहिलं आहे की, “34 वर्षापूर्वी आणि आज 34 वर्षानंतरही…प्रवास सुरु आहे. माझ्यासोबत राहण्यासाठी धन्यवाद”. एवढंच नाही तर हा व्हिडीओ शेअर करत त्यानं त्याला कॅप्शन दिलं आहे की,”किसी का भाई,किसी की जान”.
दरम्यान, सलमान खानने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तसंच त्याच्या या पोस्टवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट्स करताना दिसत आहेत.