Top 5क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेशमुंबई
भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला पाजले पाणी! भारत विजयाच्या उंबरठ्यावर…
दुबई : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने नाणे फेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानी फलंदाजांना मैदानावर जास्त वेळ थांबू न देता भारतीय गोलंदाजांनी तंबूत पाठवले. एकापाठोपाठ एक गडी बाद करत विसाव्या ओव्हरच्या शेवटापर्यंत संपुर्ण पाकिस्तानी संघ गारद झाला. यामुळे भारताचा विजय निश्चित मानला जात आहे.
विसाव्या ओव्हरच्या शेवटच्या बाॅलमध्ये पाकिस्तानचा शेवटचा गडी चित करत 147 धावा देत भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगीरी केली आहे. आता भारतीय संघासमोर 148 धावांचे लक्ष असून भारतीय फलंदाजांकडून मोठ्या आशा लागलेल्या आहेत.