“पवार कुटुंबीय सोडून दुसरं कोणी मोठं झालेलं…”, गोपीचंद पडळकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

मुंबई | Gopichand Padalkar On Supriya Sule – राष्ट्रावादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्यातील सत्ताधाऱ्यांनी 50 खोके घेऊन लाल दिवा ओरबाडून मिळवला आहे”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसंच आता सुप्रिया सुळे यांच्या या टीकेला भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, “महाराष्ट्रात पवार कुटुंबीय सोडून कुणी मोठं झालेलं सुप्रिया सुळे यांना सहन होत नाही. हेच त्यांचं सर्वात मोठं दु:ख आहे. त्यांचे वडील शरद पवार हेच या राज्याचे मुख्य आहेत. तेच राज्यामध्ये काहीतरी राजकीय बदल करू शकतात, असं त्यांना वाटतं. या विचाराला एकनाथ शिंदेंनी छेद दिला आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना फार मोठी साथ दिली.”
“भाजपने एका सर्वसामान्य मराठा कुटुंबातील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं, हे सगळ्यात मोठं दुखणं पवार कुटुंबीयांचं आहे. अजित पवारही फुटले होते, पण त्यांच्यामागे दोन आमदारही राहिले नाहीत. एकनाथ शिंदेमागे ५० आमदार ठामपणे उभे राहिले. त्यामुळे पवार कुटुंबाच्या पोटातील दुखणं वेगळं आहे आणि ते बोलतात वेगळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, हे त्यांना सहन होत नाहीये” अशी टीका देखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.