देश - विदेशराष्ट्रसंचार कनेक्टसंडे फिचरसंडे मॅटिनी

राणी एलिझाबेथपर्वाचा अंत

राणी गेली…
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी (दि. ८ सप्टेंबर) निधन झालं. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रॉयल फॅमिलीने दिलेल्या माहितीनुसार, महाराणी एलिझाबेथ द्वितीय मागील काही काळापासून आजाराने त्रस्त होत्या. या आजारामुळे त्यांना उभं राहण्यात, चालण्यात अडचणी येत होत्या. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचीही लागण झाली होती. अशातच गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडली. तेव्हापासून त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली होत्या. दरम्यान, एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटन शोकसागरात बुडाला आहे. ब्रिटनसह अनेक देशांनी त्यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहिली. यासोबत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर भारताच्या गृह मंत्रालयाकडून एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर आज ११ सप्टेंबरला भारतामध्ये एक दिवसाचा राष्ट्रीय शोक पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

७० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची कारकीर्द थोडी-थोडकी नाही, तर तब्बल ७० वर्षांची ठरली. या कालावधीत त्यांनी ब्रिटनचे १५ पंतप्रधान पाहिले. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा चार्ल्स हे ब्रिटनचे किंग झाले आहेत. एलिझाबेथ या फक्त ब्रिटनच्या नाही, तर १४ आणखी देशांच्या महाराणी होत्या. हेच पद आता किंग चार्ल्स यांच्याकडे आलं आहे.

वेस्टमिन्स्टर अॅबे येथे होणार अंत्यसंस्कार
महाराणी एलिझाबेथ यांचं पार्थिव हे आधी रॉयल ट्रेनने एडिनबर्ग या ठिकाणी आणण्यात येईल. त्यानंतर त्यांचं कॅफेन रॉयल माइल ते सेंट जाइल्स कॅथेड्रलपर्यंत नेण्यात येईल. या ठिकाणी शाही परिवारातले सदस्य आणि जनता महाराणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवाला आदरांजली वाहणार आहे. त्यानंतर पार्थिव पुन्हा एकदा रॉयल ट्रेनमध्ये किंवा हवाई मार्गाने लंडनमधील बकिंगहॅम पॅलेस या ठिकाणी आणलं जाईल. पंतप्रधान आणि कॅबिनेटचे सदस्य पार्थिव ताब्यात घेतील. बकिंगहॅम पॅलेसमध्ये महाराणी एलिझाबेथ यांचं पार्थिव ठेवण्यात आल्यानंतर ८ दिवसांचा दुखवटा असेल. त्यानंतर वेस्टमिन्स्टर ॲबे या ठिकाणी महाराणीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
जगात एक महत्त्वाची घटना घडली, ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. ब्रिटनसाठी हा अत्यंत दुःखद काळ होता, तसेच संपूर्ण जगानेही राणीला निरोप दिला. एलिझाबेथच्या निधनानंतर अनेक सामने पुढे ढकलण्यात आले. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामनाही एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला.

क्वीन आणि भारतीय क्रिकेटचं विशेष नातं
इंग्रजांनीच भारतात क्रिकेट आणले, स्वातंत्र्यापूर्वी, जेव्हा भारतात ब्रिटिश राजवट होती, तेव्हाच टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली १९३२ मध्ये. भारताने प्रथमच कसोटी सामना खेळला जो इंग्लंडमध्ये झाला. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताला पहिला विजय मिळाला, जेव्हा ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांची हिची सत्ता होती. मद्रासमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात होता. हा सामना ६ फेब्रुवारी १९५२ रोजी सुरू झाला. याच दिवशी ब्रिटनचे महाराजा जॉर्ज सहावा यांचाही मृत्यू झाला, त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा सामना होऊ शकला नाही. सहाव्या जॉर्जच्या मृत्यूनंतर ब्रिटनमध्ये महाराणी एलिझाबेथ II च्या कारकिर्दीला सुरुवात झाली. तसे, जून १९५२ मध्ये राणीचा राज्याभिषेक झाला.

भारताचा विजयी सामना
जेव्हा पुन्हा सामना सुरू झाला तेव्हा टीम इंडियाने हा सामना जिंकला. मद्रास कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि ८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २६६ धावा केल्या, प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ४५७ धावा केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ अवघ्या १८३ धावांत आटोपला. भारताचा कसोटी क्रिकेटमधला हा पहिला विजय ठरला.
८ सप्टेंबर २०२२ रोजी तिचा मृत्यू झाला, तेव्हा भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला. म्हणजेच, ८ सप्टेंबर २०२२ पर्यंत भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेले सर्व सामने राणीच्या कार्यकाळात जिंकले आहेत. विराट कोहलीने येथे आपले ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावून चाहत्यांना आनंदाची संधी दिली.

विराटने घेतली होती क्वीनची भेट

आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात राणी एलिझाबेथ द्वितीय या विराट कोहली आणि इतर खेळाडूंसह अनेक भारतीय क्रिकेटपटूंनाही भेटल्या आहेत. अलीकडेच, जेव्हा क्रिकेट विश्वचषक-२०१९ इंग्लंडमध्ये खेळला गेला, तेव्हा भारतीय कर्णधार म्हणून विराट कोहलीने राणी एलिझाबेथ यांची भेट घेतली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये