लम्पी संसर्गजन्य आजार दूर ठेवू

डॉ. सुधाकर झाडे : अजूनही वेळ गेली नाही, पशुधन टिकवू
पारगाव : लम्पी आजाराचे संकट निर्माण झाल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावरांची वाहतूक, बाजार पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. राज्यातील मोठा गुरांचा बाजार मानला जाणारा चाकण (ता. खेड) येथील गुरांचा बाजार बंद करण्यात आला आहे. अधिक माहिती घेण्यासाठी पारगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर झाडे यांची भेट घेऊन या संसर्गजन्य लम्पी स्कीन जनावरांना होणाऱ्या आजाराविषयीची माहिती व उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली.
जनावरांच्या संरक्षणासाठी जनावरांच्या गोठ्यात मोठ्या प्रमाणात स्वच्छता ही महत्त्वाची आहे. योग्य चारा, मिनरल मिक्श्चर, कॅल्शियम व त्वरित सर्व जनावरांना लसीकरण करणे, लिंबाच्या पाल्याचा जनावरांच्या गोठ्यात धूर करणे व निर्जंतुकीकरण करणे, गोठा परिसरात कीटकनाशकाची फवारणी करणे जेणेकरून जनावरांना संसर्गजन्य कीटकांमुळे हा लम्पी आजार रोखण्यास मदत होईल. दुभत्या जनावरांना हा आजार झाला तर दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. कारण २० लिटर दूध देणारी गाय या संसर्गजन्य लम्पी या आजारात सापडली तर, त्या जनावराची दूध देण्याची क्षमता कमी होते व शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो.
तसेच संभाजी ताकवणे यांनी पारगावचे पशुवैद्यकीय डॉ. झाडे यांना पशुपालकांना या संसर्गजन्य लम्पी आजाराविषयी अधिक माहिती व मार्गदर्शन करावे, अशी मागणी करण्यात आली व लवकरात लवकर संसर्गजन्य लम्पी स्किन आजाराच्या निवारणासाठी लस उपलब्ध करून घ्याव्यात व पारगाव परिसरातील पशूंना लसीकरण करून घ्यावे, ही विनंती करून मोठ्या प्रमाणावर या भागात शिबिरे घेण्यात यावीत. पारगाव ग्रामपंचायत सरपंच जयश्री ताकवणे यांनीही स्वच्छता मोहिमेसाठी सर्व पारगाव परिसरात फवारणीसाठी पशुपालकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
लम्पी या आजाराचे लक्षणे मोठे डास, माशी चावल्याने, जनावरांना तीव्र ताप येऊन आजारी पडणे व जनावरांच्या संपूर्ण अंगावर गोल पांढरे प्रचंड फोड येऊन त्याची जखम होणे, जनावरांची भूक मंदावणे, लवकर या आजाराचे निदान व उपचार झाले नाहीत तर गोठ्यातील अन्य जनावरांनाही हा संसर्गजन्य आजार होऊ शकतो व जनावरे दगावू शकतात. साधारण हा संसर्गजन्य आजार देशी जनावरे व वासरे यांना मोठ्या प्रमाणात होतो.
— डॉ. सुधाकर झाडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पारगाव