अर्थताज्या बातम्यापुणेमुंबईशिक्षण

शिक्षक आमदारांची पुणे ते मुंबई पायी दिंडी

पुणे : महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रातील समस्या कोणतेही सरकार आले तर सुटत नाहीत. वेळोवेळी या प्रश्नासाठी आंदोलने, उपोषण केली असून, यापूर्वीही पुणे ते मुंबई पायी दिंडी काढण्यात आली होती. तरी या शासनाला जाग आली नाही म्हणून पुन्हा एकदा रविवार, दिनांक ११ सप्टेंबर भिडे वाडा पुणे ते मुंबई मंत्रालय येथे शिक्षकांसोबत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ही माहिती पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली.

या आंदोलनात पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील, नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, तसेच अमरावती विभागाचे माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे हे सहभागी होणार आहेत.या चार आमदारांच्या नेतृत्वाखाली या पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
या राज्य शासनाला जागा आणण्यासाठी शिक्षकांच्या पुढील मागण्या घेऊन हे आंदोलन गांधीगिरी पद्धतीने चालणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा या निधीसह घोषित करून शंभर टक्के अनुदान द्यावे. त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांचा शासन निर्णय त्वरित निर्गमित करावा. विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शिक्षकांना शासन निर्णय १५ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णय लागू करून प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे, विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षणाचा शासन निर्णय कॉलेजच्या वाढीव पदांना मान्यता देऊन अनुदान लागू करणे, तसेच एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मागण्यासाठी या पायी दिंडीचे आयोजन केले.

विशेष म्हणजे पुण्यातील भिडे वाडा ज्या ठिकाणी महात्मा जोतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा चालू केली होती त्या ठिकाणाहून म्हणजे जिथे शिक्षणाचा पाया रुजला गेला तेथून या मागणी दिंडीची सुरूवात झाली आहे. आमच्या मागण्या कायम आंदोलन, उपोषण करूनच सोडवावी लागणार का, शिक्षक हा शिक्षणाच्या विकासातील प्रमुख पाया असतो. आम्हाला मागण्यांसाठी झगडावे लागणे हे दुर्दैवी आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये