“शरद पवार हे जाणते राजे नाहीत, ते तर…”; एंट्रीला लावलेल्या ‘त्या’ गाण्यावरुन भाजपची खोचक टिका!

मुंबई : (Atul Bhatkhalkar On Sharad Pawar) काल राष्ट्रवादी-काॅंग्रेसच्या दिल्ली येथिल तालकटोरा स्टेडियममध्ये पार पडलेल्या आठव्या राष्ट्रीय संमेलनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एंट्रीला लावण्यात आलेल्या ‘जोधा अकबर’ या बाॅलिवूड चित्रपटातील ‘अजीन-ओ-शान शहंशाह’ हे गाणं लावलं होतं. यावरुन भाजपने शरद पवारांवर संरसंधान साधण्यात आलं आहे. शरद पवार जाणते राजे नसून मुघल शहेनशाह आहेत, अशी खोचक टिका यावेळी भाजप आमदार अतुल भातखळकरांनी केली आहे,
दरम्यान, यावेळी भाजपकडून पवारांना डिवचवण्यात आल्याचे पहायला मिळत आहे. पुढे असं म्हटलं आहे, ते साडे-तीन जिल्ह्यांचे अजीम-ओ-शहंशाह असल्याची खोचक टिका करण्यात आली आहे. भातखळकर म्हणाले, आम्हीही तेच म्हणत होतो पवार हे जाणते राजे नसून मुघल शहेनशाहच आहेत. कोणते? ते आपल्याला माहितीच आहे.
‘मरहबा जनाब शरद पवार साहब! अज़ीम-ओ-शान शहंशाह, फ़ुरवा रावा, हमेशा हमेशा सलामत रहे। दिल्लीमधली ‘शहंशाह’ हीच खरी ओळख आहे पवार साहेबांची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर शहंशाहचे गुणगान होत आहे. राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे?’ असं ट्वीट भाजपा महाराष्ट्रने केलं आहे.