ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

पवाराच्या ‘त्या’ टिकेला मनसेचं जोरदार उत्तर; ‘आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा…’

नागपूर : (Raju patil On Sharad Pawar) राष्ट्रवादीचा उल्लेख करत शिवसेनेवर मनसेकडून वारंवार होणाऱ्या टीकेसंदर्भात माध्यमांकडून पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. पवारांसोबतची शिवसेना ही राष्ट्रवादीच्या प्राणी संग्रहालयातील प्राणी आहे, अशी टीका मनसेकडून करण्यात आली होती.

यावर पवारांनी आपल्या खास शैलीत मनसेच्या मर्मावर बोट ठेवत या प्रश्नाला अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर देत टोला लगावला. ते म्हणाले. “प्राणी वगैरे संदर्भातील उल्लेख मी इथं करणार नाही. साधारणपणे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके आमदार सुद्धा ज्यांना विधीमंडळात निवडून आणता येत नाहीत, त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचं?, असा खोचक प्रतिप्रश्न करत शरद पवार यांनी मनसेला टोला लगावला.

पवारांचा हा वार मनसे नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या टीकेला मनसे आमदार राजू पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणलं आहे. ‘आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा बोटं तोंडात घालाल’, त्याचबरोबर ‘आम्ही ‘धन’से कमी आहोत. पण ‘मनसे’ लई आहोत’, संधी सर्वांना मिळते, असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. तसेच शरद पवार यांना ‘आदर देतोय, आदर घ्या’, असंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये