ताज्या बातम्यारणधुमाळी

“उद्धव ठाकरेंविषयी उलट- सुलट बोलाल तर…”, शिवसेना नेत्याचा नारायण राणेंवर हल्लाबोल

मुंबई | Chandrakant Khaire On Narayan Rane – गुरूवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला होता. तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना लक्ष्य केलं होतं. या संदर्भात आता शिवसेनेकडून नारायण राणेंवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंना अमित शाहंनी (Amit Shah) जमीन दाखवा असं वक्तव्य केल्याचं म्हणाले. मात्र, त्याचा अर्थ त्यांना कळाला नाही. शाहंना जमिनीवर या असं म्हणायचं होतं. आता हे म्हणतात आम्ही ‘आसमान’ दाखवू. उद्धव ठाकरे असं कोणाच्या जीवावर म्हणत आहेत? शिवसेनेचा जन्म 19 जून 1966 रोजी झाला. तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षांचे होते. तेव्हापासून शिवसेना मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी संघर्ष करत होती. त्यात उद्धव ठाकरे कुठेच नव्हते”, अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.

“उद्धव ठाकरेंना 62 वं वर्ष सुरू आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात विरोधकाच्या कानफडात तरी मारली का? पक्षवाढीसाठी कधी संघर्ष केला का? ते काहीच न करता सरळ मुख्यमंत्रीपदावर आले. तेव्हा मी म्हणालो होतो की हे आयत्या बिळावर नागोबा आहेत”, असंही नारायण राणे म्हणाले होते.

यासंदर्भात बोलताना शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला आहे. “यांना समजत नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आशीर्वादानं तुम्हाला मोठं केलं आहे. उद्धव ठाकरेंबद्दल उलट-सुलट बोलाल तर याद राखा. तुमची शुगर आधीच वाढली आहे, ती अजून वाढू देऊ नका. मी स्पष्टपणे सांगतो, जास्त बोलायचं नाही. मातोश्रीनं, शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबानं तुम्हाला मोठं केलं. काय होते तुम्ही याचा विचार करा. आता तुम्ही जर मोठे झाले असाल, तर कुणामुळे झाले हे लक्षात ठेवा. यानंतर जास्त काही बोलू नका. तुम्ही वाईट बोललात तर आम्ही शिवसैनिकच आहोत. आम्ही मग काहीही बोलू”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

पुढे चंद्रकांत खैरे म्हणाले, “नारायण राणेंना मी सांगेन की त्यांनी बेकायदा घर बांधकाम केलं. एखादा सरपंच, नगरसेवकानं बेकायदा बांधकाम केलं असेल, तर त्याचं सदस्यत्व रद्द होतं. मग आता या खासदारानं जर बेकायदा बांधकाम केलं असेल, तर त्याच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई केली पाहिजे. त्या कारवाईच्या भीतीने दुसरंच काहीतरी करायचं आणि उद्धव ठाकरेंवर टीका करायची असं चालू आहे”.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये