ज्येष्ठच कुटुंबाचे उत्तम दिशादर्शक : बाबूराव चांदेरे

पुणे : आपल्या सर्वांच्या आयुष्यातील महत्वाचा घटक म्हणजे आपल्या घरातील वडीलधारी माणसं आहेत. त्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला, जीवनाला खरा आकार दिला जातो, ज्येष्ठ नागरिक हे आपल्या देशातील सर्वात अनुभवी व्यक्तिमत्त्व आहे. उन्हाळे-पावसाळे, अनेक अनुभव घेऊन त्यांचा प्रवास झालेला आहे त्यामुळे ज्येष्ठांचे सल्ले म्हणजे कटू सत्य आहे. कुटुंबाला दिशा दाखवण्याचे खरे काम करतात, असे मत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे यांच्या वतीने बाणेर येथील बंटारा भवन येथे ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी चांदेरे बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार सुनील चोरडिया यांचा अंध व्यक्तींचा “सुरसंगम मुजिकल नाईट” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बाणेर-बालेवाडी- सुस व म्हाळुंगे परिसरातील २६५ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन राहुल बालवडकर, डॉ. सागर बालवडकर, पुनम विशाल विधाते व समिर चांदेरे यांनी केले होते. याप्रसंगी मुरलीधर चांदेरे, अंकुशराव बालवडकर, नामदेव चांदेरे, अर्जुन ननावरे, सरला चांदेरे, राखी श्रीराव, मनोज बालवडकर, संजय ताम्हाणे, सुषमा ताम्हाणे,प्राजक्ता ताम्हाणे-दळवी, अजिंक्य निकाळजे , शेखर सायकर, प्रणव कळमकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.