अरविंद सावंतांचा शिंदे गटावर केला हल्लाबोल, म्हणाले; “मग सुरत गुवाहाटी…”
मुंबई : (Arvind Savant On Eknath Shinde) “सध्या शिंदे गटाकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यांना असे वाटत आहे त्यांच्यासोबतच सर्व नेते आहेत. मात्र, या देशात न्याय अस्तित्वात आहे. आम्हाला खऱ्या न्यायाची अपेक्षा आहे. एक्त आमदार -खासदार म्हणजे पक्ष होत नाही. कार्यकारिणी म्हणचे काय? शिवसेना हा नोंदनीकृत पक्ष आहे. त्या नोंदणीकृत पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे यांनी कोणी आधिकार दिले? कोण आहात तुम्ही? कार्यकारणी बदल करणारे,” असा सवाल अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला केला आहे.
पुढे बोलताना सावंत म्हणाले, “तुम्ही शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बोललात का? नाही. सुरत, गुवाहाटी, गोवा अशा बाहेरच्या राज्यांतून महाराष्ट्रात काय करायचे हे तुम्ही ठरवणार का? पळालेल्या लोकांना राज्य आणि केंद्र सरकारचे संरक्षण देण्यात आले. या सर्व गोष्टीची सूत्र केंद्रातील सत्ताधीश, भाजप सरकार ज्या प्रकारे पडद्यामागून हालवात आहे. हा प्रकार संविधानाला घाला घालणारा आहे. राज्यपालांकडून देखील हेच झाले आहे, हे सर्व राज्याने पाहिले आहे.
शिवसेना पक्षाची एक मोठी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे. त्यामध्ये राज्यातील जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुक हे देखील आहेत. यामध्ये 180 लोक आहेत. पक्षाची स्वःताची अशी एक घटना आहे. त्या घटनेनुसार पक्षाला मान्यता मिळाली आहे. त्याप्रमाणे शिवसेना हा एक मान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आहे, त्यामुळे असे किती आले गेली तरी तो पक्ष अबाधित राहात असतो अशी सावंत यांनी पक्षाची सर्व घटनाच वाचून दाखवली.