महाराष्ट्ररणधुमाळी
चंद्रकांत खैरे वाया गेलेली केस : गुलाबराव पाटील

औरंगाबाद : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठल्याने शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गद्दाराने पाप केल्यामुळे निवडणूक चिन्ह गोठवले गेले असा आरोप केला होता. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी खैरे यांच्यावर पलटवार केला आहे.
‘चंद्रकांत खैरे म्हणजे वाया गेलेली केस आहे.
त्यांच्याविषयी काय बोलणार,’ अशी मिश्कील टीका त्यांनी केली आहे. तर शिंदे यांनी बंड केल्यानंतर चंद्रकांत खैरे आणि गुलाबराव पाटील यांच्यात अनेक वेळा शाब्दिक वादावादी झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. तर फडणवीसांना हा सगळा डाव रचला. फडणवीस आणि मोदी हे एकमेकांचे खास आहेत.