होऊ दे खर्च, यंदा दिवाळी धुमधडाक्यात!

यंदा दिवाळी आहे होऊ दे खर्च असे म्हटले तर आता वावगे ठरणार नाही. पुणे शहरासह विविध ठिकाणी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सज्ज झालेल्या बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. सर्वांच्या घरा-घरांतील स्वच्छता आणि रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यात असून दिवाळीचा फराळ बनविण्याची जोरदार तयारी महिलांनी सुरू केली आहे.
आमच्याकडे दरवर्षी दहा ते बारा हजार किलो विविध प्रकारचा फराळ बनवला जातो. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने साहजिकच बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. सध्या महागाई मोठ्या प्रमाणात असुन आहे याचा फटका सर्वांना बसत आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे.
— अभय भिसे(विक्रेते) अद्वैत फुडस, चिंचवड
पुणे : लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणारा, सर्वत्र प्रकाश, चैतन्य आणि मांगल्याचे वातावरण निर्माण करणारा, फटाक्यांची आतषबाजी, पंचपक्वानांची गोडी आणि नात्या-नात्यांमध्ये स्नेह व मैत्रीची मधुरता वाढविणारा दीपोत्सवाचा सण आता केवळ दहा ते बारा दिवसांवर येऊन ठेपला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करता आली नाही.
सध्या बाजारपेठेमध्ये आकाश कंदील विविध प्रकारचे पाहायला मिळत आहे इको फ्रेंडली आकाशदिवे बनवण्याचा आमचा कल असून यामध्ये कापडी आकाश कंदील जास्त प्रमाणात ग्राहकांचे आकर्षण बनले आहे गतवर्षाच्या तुलने 30 ते 40 टक्के याची किंमत वाढली असली तरी सुद्धा ग्राहक यालाच जास्त पसंती देत आहे.
— वर्षा दीक्षित (विक्रेते) राजहंस स्टेशनरी, पुणे
परंतु यंदाची दिवाळी मात्र मोठ्या धुमधडाक्यात साजरी होताना दिसणार आहे कारण सध्या बाजारपेठ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांनी फुलून गेले आहेत. त्यामुळे यंदा दिवाळी आहे होऊ दे खर्च असे म्हटले तर आता वावगे ठरणार नाही. पुणे शहरासह विविध ठिकाणी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सज्ज झालेल्या बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. सर्वांच्या घरा-घरांतील स्वच्छता आणि रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यात असून दिवाळीचा फराळ बनविण्याची जोरदार तयारी महिलांनी सुरू केली आहे.
आता मुलांना शाळांना सुटी मिळणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांसह सर्वांनाचा आता उत्सवाचे वेध लागले आहेत. चिमुकल्यांनी किल्ले बांधकाम सुरू केले असून, सैन्य खरेदीसाठी तर त्यांचे आईबाबा त्यांना नवीन कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत धाव घेत आहेत. उत्सवानिमित्तच्या मोठया आर्थिक उलाढालीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. आकर्षक आणि रंगीबेरंगी पणत्या रस्त्यांवर ठिकठिकाणी विक्रीसाठी मांडल्या आहेत. दुकानांबाहेर लटकणारे छोटया-मोठया आकारातील रंगीबेरंगी आकाशकंदील, तोरण, रांगोळ्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.
पणत्यांचे ग्राहकांना आकर्षणआधी मातीच्या साध्या रंग नसलेल्या पणत्या असायच्या मात्र काही वर्षापासून मातीच्याच पण नव-नवीन आणि विविध रंगातील आकर्षक पणत्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे मातीच्या पणत्यांबरोबरच पेटवल्यानंतर सुगंध आणि सुवास पसरवणाऱया फॅंशनेबल पणत्या ग्राहकांना भुरळ पाडत आहेत.
ग्रीन, ऍपल, लेमन, स्ट्रॉबेरी अशी त्या नवीन बाजारात आलेल्या पणत्यांची नावे आहेत. शहरातील ठराविक दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या या पणत्या इतर पणत्यांच्या किंमती 50 रूपयांपासून 250 रूपयांपर्यंत आहेत. तुळशी बाग, कुंभारवाडा येथे या रंगेबेरंगी पणत्या उपलब्ध आहेत.
आकाशकंदीलांच्या किंमती वाढल्या….
दरवर्षीप्रमाणे बाजारपेठांमध्ये आकाशकंदीलांचा झगमगाट आहे. यंदा ही आकाश कंदीलांमध्येही नवीन प्रकार पहायला मिळत आहेत. साध्या पातळ व जाड रंगीबेरंगी कागदापासून बनविलेले, प्लास्टिकचे तसेच कापडी आकाशकंदील सुध्दा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. यावेळी आकाशकंदीलमध्ये नवीन प्रकार दिसत आहेत, सजावटीसाठी वापरले जाणारे छोटया आकारातील आकाशकंदील 5 रूपयांना मिळत आहेत तर इतर प्रकारातील आकाशकंदीलांच्या किंमती साधारणपणे 25 रूपयांपासून 800 रूपयांपर्यंत आहेत. यावर्षी 20 ते 25 टक्क्यांपर्यंत किंमती वाढल्या आहेत. किराणा मालांच्या दुकानांमध्ये गर्दी…
दिवाळी म्हटले की, पंचपक्कवानांचा फराळ आलाच. लाडू, करंजी, चकल्या, शंकरपाळ्या, अनारसे, चिवडा या प्रमुख पदार्थांबरोबरच इतर अनेक पदार्थांची फराळात रेलचेल असते. हे पदार्थ बनविण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी सध्या ग्राहकांनी किराणा मालाच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी केली आहे. रवा, तेल, साखर, मैदा, पोहे, चना डाळ, खोबरे या वस्तुंच्या किंमतींही गगनाला भिडल्या आहेत.
फराळ विक्रीला सुरुवात
काही महिला बचत गटांनी,गृहउद्योग करणाऱ्या महिलांनी आता फराळ विक्रीला सुरुवात केली आहे. त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्या महिलांना घरात फराळ बनवण्यासाठी वेळ नसतो अशा महिला सणासुदीनिमित्त या स्टॉलला भेट देतात आणि फराळ खरेदी करतात.
रंगीबेरंगी तोरण, हार,फुलमाळा…
बाजारात यंदा ग्राहकांना आकर्षिक करतील असे तोरण, हार दिसत आहेत. गृहसजावटीसाठी महिला तोरण, हार , नकली फुलमाळा यांना अधिक महत्त्व देतात. त्यामुळे जरी त्यांच्या किंमतीत वाढ जरी झाली तरी घर सुंदर बनवण्याच्या दृष्टीने ग्राहक फुल माळा, तोरण यांना अधिक पसंती देत आहेत.
बाजारपेठात आकाशकंदिल
दिवाळी अवघी काही दिवसावर येवून ठेपली आहे. त्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सजवलेल्या घरासमोर छानपैकी आकाशकंदिल लावण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे. विविध रंगातील विविध प्रकारातील आकाशकंदिल बाजारात दाखल झाले असून अगदी आकाशकंदिलांचा झगमगाटच दिसत आहे. यंदा चायना माल बंद असल्याने भारयीत आकाशकंदीलला जास्त मागणी आहे, किमान 25 ते 20 टक्क्यांनी भाव वाढले असूनही भारतीय आकाशकंदीलला अधिक मागणी आहे. कापडी, कागदी आकाशकंदीलमध्ये विविध प्रकार बाजारात विक्रीसाठी आले आहेत.
बाजारात विक्रीसाठी किल्ले
लहान मुलांना किल्ले बनवण्याचे फार मोठे आकर्षण असते परंतु बाजारात आता तयार किल्ल्यांच्या प्रतिकृती मिळत असल्याने विविध प्रकारचे किल्ले बाजारात उपलब्ध झाले आहे ते पाहण्यासाठी आज रविवारी मुलांनी आपल्या पालकांसह बाजारपेठेत गर्दी केली आहे.
कपडे खरेदी कडे वाटता कल
आज रविवार असल्यामुळे खरेदीसाठी मुले आपल्या पालकांचं कपडे खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून येत होते.वर्षातला मोठा सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते. या दिवाळीनिमित्त विविध प्रकारचे कपडे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत उपलब्ध झाले आहे. यामध्ये सुद्धा गतवर्षीच्या तुलनेत जवळजवळ 50 ते 70 टक्के वाढ झाली असल्याचे कपडे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तरीसुद्धा नागरिकांनी दुकानांमध्ये कपडे खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसत आहे.