भागवत कथासार ग्रंथावर परिसंवाद : “अध्यात्म हाच यशस्वी जीवनाचा पाया”: उल्हासदादा पवार

पुणे : १९८५ सालापासून अध्यात्म ऐकत ऐकत जगायला शिकलो. त्यामुळे जीवन अध्यात्मिक बनत गेले. माझ्या जीवन काळात बाळासाहेबांशी माझा अनेक कार्यक्रमात प्रत्यक्ष संबंध आला. वै. बाळासाहेब भारदे यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत देत कार्यक्रमाचे अध्यक्ष उल्हास पवारांनी आपल्या अध्यात्मिक विचाराची उधळण केली.
निमित्त होते ह.भ.प. बाळासाहेब बडवे लिखित भागवत कथासार ग्रंथावरील परिसंवादाचे. हा कार्यक्रम श्रमिक पत्रकार भवन येथे संपन्न झाला. ग्रंथकार बाळासाहेब बडवे यांना संत तुकाराम जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोकराव काळे यांच्यावतीने संत तुकाराम महाराजांची पगडी व गाथा भेट देण्यात आली.
ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. यशोधन साखरे महाराज बोलताना म्हणाले, ‘श्रीमंत भागवत ग्रंथ हा जीवनातील प्रत्येक स्वराचा अर्थ स्वर आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांनी वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माचा केलेल्या प्रसाराचे मूळ तत्वज्ञान श्री भागवताचे सार आहे. अनुताप हा अध्यात्माचा एक विशेष शब्द असून, संत ज्ञानेश्वर महाराज आणि समर्थ रामदासांनी या शब्दाचा गर्भीतार्थ समाजाला सांगून ठेवला आहे.
अध्यात्माचे मूळ सूत्र श्रद्धा भक्ती असल्याने वारकरी संप्रदाय आणि संत यांची एक मौलिक परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे.’ प्रथम बलवंत प्रतिष्ठानचे प्रमुख शहाजीराव बळवंत यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, श्री. बडवे लिखित भागवताचा शब्द भांडार हा प्रचलित समाज व्यवस्थेशी जोडणारा असून, पत्रकािरता जशी नििर्भड केली, तसे भागवताचे लिखाण समाजव्यवस्थेशी जुळणारे असे आहे. म्हणून या परिसंवादाचा घाट आमच्या संस्थेच्यावतीने घालण्यात आला. भोसरीचे हरीभक्त पारायण दत्तात्रय महाराज गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
डोंिबवलीच्या प्रबोधनकार अपर्णा परांजपे म्हणाले, ‘बाळासाहेब बडवे यांच्या अंतकरणावर झालेल्या धार्मिक संस्काराचे परिणाम त्यांच्या जीवनात उमटलेले दिसतात. चतुरस्त्र बुद्धिमत्ता आणि विनम्रता हा त्यांचा गुण आहे. बडवे महाराजांनी आपले आयुष्य धार्मिकतासह जपता जपता निष्काम कर्मयोगाचे जणू काही बाळकडूच दिले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांपासून सर्व संतांनी अध्यात्म जगायला शिकवले. हे जग हा अध्यात्मवादाचा खरा गाभा श्रीमंत भागवतात दिसतो.
पुणे, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी अध्यात्माचे श्रेष्ठत्व विषद करुन मराठीसारख्या शाळेत सहा-सहा महिने पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी मार्ग प्रतिक्षा करावी लागते. हे मराठी भाषेचे मोठेपण आहे, असे सांगितले. भारतीय मजदूर संघाचे दीपक कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. मुख्य संयोजक शहाजीराव बळवंत व दत्तात्रय महाराज गायकवाड होते.