ईद-ए-मिलाद निमित्त पर्यावरणाचा संदेश

पुणे : नही छोडेंगे, नहीं छोडेंगे तालिम का दामन नहीं छोडेंगे, जो ज्ञान की खाण में घर-बार छोड देता है वह अल्लाह के रास्तेपर चलता है, रात में एक घंटे ज्ञानदान करना रातभर इबादत करनेसे बेहतर है, स्वर्ग आईच्या चरणाखाली आहे, खोटे बोलणे सोडा दुष्कर्म आपोआप सुटतील, असे हजरत मोहम्मद पैगंबरांचे शैक्षणिक, सामाजिक संदेश, घोषवाक्याचे फलक मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या वतीने रविवारी ‘हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ झाला.
मिरवणुकीद्वारे पैगंबरांच्या शिकवणुकीचा प्रसार
आझम कॅम्पसचे विद्यार्थी बग्गीत अरबी पोषाखात मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. आपल्या मातृभूमीवर प्रेम करावे, राष्ट्राप्रमाणेच जगातील सर्व राष्ट्रांवर प्रेम, आपुलकी, मदत, मैत्री करण्याची शिकवण हजरत पैगंबरांनी दिली. त्याचा प्रसार करण्यासाठी ही मिरवणूक दरवर्षी काढण्यात येते. मिरवणुकीचे यंदाचे अठरावे वर्ष होते.
संस्थेचे सचिव प्रा. इरफान जे. शेख, शाहिद इनामदार, एस. ए. इनामदार, तसेच गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट, हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट, एमएमईआरसी, डेक्कन मुस्लिम लायब्ररी, अवामी महाज संस्थेचे पदाधिकारी, व आझम कॅम्पस शिक्षण संकुलाचे प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते.