ताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रसंचार कनेक्टशेत -शिवार

परतीच्या पावसाचा साेयाबीनला फटका

नांदेड : परतीच्या पावसाने मराठवाड्यात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि पैठण भागात याचा परिणाम झाला आहे. नांदेड जिल्ह्यात विजयादशमीपासून (दि. ५) दररोज हलका ते हलका पाऊस पडत आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळीही मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. काही तालुक्यांत मात्र शेतशिवारात पाणी साचून राहिले आहे.

सध्या सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे, तर काही ठिकाणी कापून ठेवलेल्या सोयाबीनला मोड फुटत आहेत. बियाण्यासाठी केलेला खर्चही निघणेही कठीण हाेणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर, सिरंजनी, हिमायतनगर, सरसम, सवना, बोरगडी, धानोरा, घारापूर, डोल्हारी, कामारी, पोटा, मंगरूळ, वारंग टाकळी, सिरपल्लीसह अनेक गावांतील शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला. तसेच किनवट तालुक्यातील शिवणी, जलधारा या मंडळात दोन द‍िवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला. माहूर, भोकर, अर्धापूर इतर तालुक्यांतील पिकांचीही परिस्थ‍िती सारखीच आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात १८०० हेक्टरवर सोयाबीनचे लागवड क्षेत्र असून त्यांपैकी काढणीला आलेल्या एक हजार हेक्टरवर नुकसान असल्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट यांनी म्हटले आहे.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे पीक धोक्यात आले आल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. यंदा धुके पडल्याने विविध जिल्ह्यांत सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये