३४ गावांच्या विकासकामांकरिता प्रशासनाने दहा हजार कोटी द्यावे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. वंदना चव्हाण आणि पुणे शहर अध्यक्ष व माजी महापौर यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेचे प्रशासक व आयुक्त विक्रम कुमार यांना ३४ गावांच्या विकासकामासाठी पालिकेने राज्य सरकारकडे दहा हजार कोटींच्या अनुदानांबाबत मागणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे.
सन २०१७ साली पुणे महानगरपालिकेत ११ गावांचा समावेश झाला, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २०२१ साली उर्वरित २३ गावांचा समावेश झाला असे असूनही ही ३४ गावे विकासापासून वंचित आहे. या गावांमध्ये मुलभूत सुविधांची सुद्धा वानवा आहे. तरी या ३४ गावांचा जलदगतीने विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. दर्जेदार रस्त्यांचे जाळे उभारणे, नव्याने ड्रेनेज लाईन टाकणे, STP प्लान्ट उभारणे, पाणीपुरवठा योजना राबवणे, प्रार्थमिक आरोग्य सुविधा देणे. या सर्व विकास कामाच्यासाठी प्रशासनाने महाराष्ट्र राज्य सरकारकडे दहा हजार कोटी रुपयांची मागणी करावी व त्या अनुदानातून या ३४ नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विकास करावा अशी मागणी प्रशासक व पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे केली आहे.
या शिष्टमंडळात खा. वंदना चव्हाण, आ.चेतन तुपे पाटील, आ. सुनिल टिंगरे, पुणे शहराध्यक्ष मा. महापौर व मा. नगरसेवक प्रशांत जगताप, मा. विरोधी पक्षनेत्या व मा.नगरसेविका दिपाली धुमाळ, मा. स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे व आश्विनी कदम, ॲड. निलेश निकम, मा. उपमहापौर दीपक मानकर, मा. नगरसेवक प्रकाश कदम, मा. नगरसेवक पठारे, मा.उपमहापौर अकुंश काकडे, मा.नगरसेवक काका चव्हाण, प्रवक्ते प्रदीप देशमुख पदाधिकारी उपस्थित होते.