पिंपरी चिंचवडराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स
आरोग्यविषयक उपक्रमांनी वर्धापनदिन साजरा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 40 वर्धापन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम व आरोग्य विषयक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवडनगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे आदी उपस्थित होते.