क्रीडाराष्ट्रसंचार कनेक्ट
भारताची ऑस्ट्रेलियाच्या जुन्या विश्वविक्रमाची बरोबरी

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या विजयासह भारतीय संघाने मोठी कामगिरी केली आहे. भारताने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या आॅस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. अरुण जेटली स्टेडियमवर मंगळवारी खेळल्या गेलेल्या निर्णायक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.
भारताने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या आॅस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. भारताने आता २०२२ मध्ये सर्व फॉरमॅटमध्ये ३८ सामने जिंकले आहेत. आॅस्ट्रेलियाने २००३ मध्ये सर्व फॉरमॅटमध्ये ३८ सामने जिंकले होते.