ताज्या बातम्यारणधुमाळी

भाजप प्रवेशाच्या चर्चांवर एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…

बुलढाणा | Eknath Khadse – गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता या चर्चांना एकनाथ खडसेंनी पूर्णविराम दिला आहे. “मी भाजपमध्ये जाणार नाही, मी राष्ट्रवादीतच राहणार, असं खडसे यांनी सांगितलं आहे. जर येणाऱ्या काळात विरोधी पक्ष विखुरलेल्या अवस्थेत राहिला तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो आणि तसं कारस्थान भाजपकडून सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचंही एकनाथ खडसे म्हणाले. ते बुलढाण्यात बोलत होते.

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली असल्याचा खुलासा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. तसंच खडसे आणि त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) हे अमित शाहंच्या भेटीसाठी दिल्लीत गेल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे एकनाथ खडसे आगामी काळात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, आपण भाजपमध्ये जाणार नाही, राष्ट्रावादीतच राहणार असं उत्तर एकनाथ खडसेंनी दिलं आहे.

पुढे एकनाथ खडसे म्हणाले, एकेकाळी भाजपचे दोन खासदार असताना भाजपला हिणवलं जायचं. त्यावेळी आम्ही मोठ्या मेहनतीनं पक्ष वाढवला. तर बनिया, ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांच्यामुळे बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये