मी परत भाजपात जाणार नाही : एकनाथ खडसे

बुलढाणा : मी भाजपात जाणार नाही, मी राष्ट्रवादीतच राहणार, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिले. जर येणाऱ्या काळात विरोधी पक्ष विखुरलेले अवस्थेत राहिला तर त्याचा फायदा हा भाजपाला होऊ शकतो आणि तस कारस्थान भाजपाकडून सुरु असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर आरोपही यावेळी खडसे यांनी केला आहे.बुलढाण्यात बोलताना मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे खडसे यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
नुकतेच खडसेंनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यावेळी एकनाथ खडसे हे आगामी काळात पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु आपण भाजपमध्ये जाणार नाही, राष्ट्रवादीतच राहणार, असे ठाम उत्तर एकनाथ खडसेंनी दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.