ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“जास्त म्याव म्याव केलं तर…,” नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना जाहीर इशारा, तर मशाल चिन्हाचा केला आवमान म्हणाले…

मुंबई : (Nitesh Rane On Aaditya Thackeray) अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या निमित्ताने ठाकरे गट आणि सत्ताधारी आमने-सामने आले असून दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. यावेळी भाजप आमदार नितेश यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टिका केली आहे. ते म्हणाले, जास्त म्याव म्याव केलं तर ते सर्व बंद करायचे औषध माझ्याकडे असल्याचा यावेळी इशारा दिला आहे.

प्रसारमाध्यमांनी ठाकरेंना दिलेल्या नव्या चिन्हासंदर्भात राणेंना प्रश्न विचारला असता त्यांनी ही मशाल नसून आईस्क्रीमचा कोन असल्याचा टोला लगावला. “उद्धव ठाकरे या माणसाचं चिन्ह हे मशाल नाही कारण त्याच्यातली आग कधीच विझली आहे. खरं तर आईस्क्रीमचा कोन मिळाला आहे जो थंड पडलेला आहे,” असं नितेश राणे म्हणाले.

दरम्यान त्याआधी आदित्य ठाकरे म्हणाले होते, “अशा निवडणुकींमध्ये विरोधी उमेदवार देणं योग्य नसतं. पण त्या परिस्थितीतही खोके सरकारने जे खेळ केले त्यातून त्यांचं काळं मन समोर आलं आहे. शिवतीर्थ असो किंवा लटकेंची लढाई, पालिकेवर हुकूमशाहीचा दबाव आहे. हे राजकारण भलतीकडे चाललं आहे. यातून खोके सरकार निर्दयी असल्याचं समोर येत आहे. माणुसकी विरुद्ध खोकासूर अशीच ही लढाई झाली आहे,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये