राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या ‘वर्षा’ बंगल्यावर, भेटीचे कारण मात्र गुलदस्त्यात; चर्चेला उधाण…

मुंबई : (Raj Thackeray Meet Eknath Shinde) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवार 15 रोजी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं असं सांगण्यात आलं आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीच्या पार्श्वभुमीवर ही भेट झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ठाकरे-शिंदे भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत आरोग्यविषयक चर्चेसोबतच पुढील महिन्यात होणाऱ्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबतही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीत मनसे भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला पाठिंबा देणार का याकडे लक्ष असणार आहे.
चार महिन्यापुर्वी शिवसेनेत पडलेली मोठी फूट, त्यामुळे राज्यात झालेले संत्तांतर, आगामी काळात होऊ घातलेली मुंबई महापालिका निवडणूक आणि सध्या सुरु असलेली अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी याबाबत या बैठकीत विशेष चर्चा होईल झाल्याचे तर्क-वितर्क लावले जात आहेत. मागील दोन महिन्यातील शिंदे-ठाकरे यांनी ही तिसरी भेट आहे.