अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य राहील, शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “यामुळे महाराष्ट्रात…”

मुंबई : (Sharad Pawar On Andheri By Election Press conference) अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल आणि याने महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मत व्यक्त केलं आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचं समर्थन करत आज पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
दरम्यान, दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके या निवडणूक लढत आहे. भाजपने मुरजी पटेल यांना निवडणूकीच्या मैदानात उतरले आहे. यावेळी पवार म्हणाले, महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक झाली. मी राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून तेव्हा भूमिका घेतली होती की, मुंडेच्या परिवारातील कोणीही उभा राहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, रमेश लटके यांचा योगदान पाहता. ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य राहील, आणि एक चांगला संदेश जाईल. महाराष्ट्रत योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे, असं ते म्हणाले आहेत.