ताज्या बातम्यारणधुमाळी

“तुम्ही कसा काटा लावला होता? याची…”, चंद्रकांत पाटलांची अजित पवारांवर खोचक टीका

मुंबई | Chandrakant Patil On Ajit Pawar – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल (17 ऑक्टोबर) पुण्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. पुण्याला नद्यांचं स्वरूप आलं आहे. वाहतुकीबाबत कुणाचं लक्ष नाही. वाहतुककोंडीबाबत पोलिसांना विश्वासात घेण्याची गरज आहे. पुण्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. याकडे लक्ष द्यायला हवे, ते लक्ष दिले जात नाही, असा आरोप अजित पवारांनी केला आहे. तसंच त्यांनी केलेल्या या आरोपावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पलटवार केला आहे.

“गेल्या अडीच वर्षात तुमचं सरकार होतं. पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता असली तरी पालकमंत्री तुम्ही होता. या कालावधीत तुम्ही कसा काटा लावला होता? कसा हूक लावला होता? याची ही मोठी उदाहरणं आहेत. पालकमंत्री म्हणून तुम्ही महानगरपालिकेला आदेश देऊन खूप गोष्टी करून घ्यायला हव्या होत्या. त्या तुम्ही करून का नाही घेतल्या? तुम्ही बाकीच्याच विषयांमध्ये जास्त रस घेतला, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, “अजित पवार हे मागील अडीच वर्षापासून पुण्याचे पालकमंत्री होते. दरम्यान, त्यांनी महापालिकेला कसं दमवलं? याची खूप मोठी उदाहरणं आहेत. पालकमंत्री म्हणून तुम्ही गटर, नाले साफ करून घ्यायला हवे होते. ते तुम्ही केलं नाही. आता काल तुम्ही पायउतार झाल्यानंतर आज लगेच आरोप करत आहात”, असंही पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये