ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून, निंबाळकरांचा अध्यक्षपदाचा राजीनामा! 

पुणे : (Railway Divisional Committee President Ranjit Nimbalkar resigned) रेल्वे विभागात बाबूगिरीचा हुकूम चालतो हे पुन्हा एकदा समोर आले असून याचा फटका आता थेट खासदारांना बसल्याचं दिसून आलं आहे. पुण्यात झालेल्या रेल्वे विभागाच्या बैठकीत वाद झाल्यानंतर रेल्वे विभागीय समितीचे अध्यक्ष खासदार रणजित निंबाळकर यांच्यासह सदस्य असणाऱ्या खासदारांनी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे. 

कोविड काळात सुरु असलेले रेल्वे गाड्या पुन्हा सुरु कराव्यात, विद्यार्थी आणि प्रवाशांच्या मागणीनुसार थांबे द्यावेत अशा विविध मागण्या सातत्याने करून देखील रेल्वेचे अधिकारी ते ऐकत नसल्याने या बैठकीत सर्वच खासदार आक्रमक झाले. रेल्वे प्रशासनाने आपलीच मनमानी सुरु ठेवल्याने आपण विभागीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी जाहीर केले.

वारंवार मागणी करून रेल्वे बोर्ड सदस्य असणाऱ्या खासदारांच्या मागणीला किंमत देत नसल्याने या रेल्वे मंडळाचा अध्यक्ष म्हणून राजीनामा देत असल्याचं खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी सांगितलं. यावेळी इतर सर्व खासदारांनीही रेल्वे मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली. यापुढे रेल्वे मंडळाच्या कोणत्याही बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये