ताज्या बातम्यामनोरंजन

“तेव्हा मी खूप रडले…”, कतरिना कैफचा बाॅलिवूडबाबत धक्कादायक खुलासा

मुंबई | Katrina Kaif – बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं तिच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसंच कतरिनाचे लाखो चाहते देखील आहेत. मात्र, सिनसृष्टीत काम करत असताना सुरूवातीच्या दिवसांमध्ये कतरिना कैफला बऱ्याच कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला होता. यासंदर्भात तिनं एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

‘आज तक’च्या वृत्तानुसार कतरिनानं सांगितलं की, “‘साया’ चित्रपटामधून मला बाहेर काढण्यात आलं आहे. चित्रपटामधून तुला काढलं नाही तर त्याजागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेतलं आहे असं मला सांगितलं गेलं. जाॅन अब्राहन व तारा शर्माची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट अनुराग बासूचा होता. मी एक सीन चित्रीत केल्यानंतर मला चित्रपटामधून बाहेर काढण्यात आलं. त्यावेळी मला असं वाटलं की माझं आयुष्य व करिअर आता संपलं.”

“कलाकार म्हटलं की नकार सहन करावाच लागतो. तुझ्यामध्ये काहीच चांगलं नाही, तू अभिनेत्री बनूच शकत नाही असं कित्येकांनी माझ्या तोंडावर येऊन सांगितलं. तेव्हा मी खूप रडले. पण जे ध्येय गाठायचं होतं तो प्रवास करणं मी कधीच सोडलं नाही”, असं कतरिनानं सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये