इंग्लंडचे पंतप्रधान भारतीय वंशाचे झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचे भारतीय व्यवस्थेवर टीकास्त्र; म्हणाले, “आपल्या इथे 500 वर्षे…”

मुंबई : काल इंग्लंडच्या पंतप्रधानाची घोषणा करण्यात आली. ऋषि सुनक हे भारतीय वंशाचे नेते इंग्लंडचे पंतप्रधान झाले आहेत. ही भारतीयांसाठी खरंच अभिमानाची बाब आहे. १५० वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्लंडमध्ये आता एक भारतीय वंशाची व्यक्ती सरकार चालावणार यामुळे संपूर्ण भारतवासीयांच्या मनात अभिमानाची भावना आहे. देशभरातील विविध क्षेत्रांतील दिग्गज ऋषि सुनक यांना सुभेच्छा देत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय वंशाच्या व्यातीने इंग्लंडच्या पंतप्रधान होण्याच्या घटनेवरून भारतीय व्यवस्थेवर टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत ‘ऋषि सुनक हे इंग्लंडमधील भारतीय वंशाचे दुसऱ्या पिढीतले नेते असून त्यात ते अल्पसंख्यांक आहेत. तरी ते इंग्लंडचे पंतप्रधान होऊ शकतात. मात्र, भारतात ५०० वर्षे राहिलेल्यांना नागरिकत्व सिद्ध करायला सांगतात.’ अशी टीका केली आहे.