ताज्या बातम्यारणधुमाळी

“मोरूच्या मावशीने मोठा डल्ला मारला…”, मनसे नेत्याची किशोरी पेडणेकरांवर खोचक टीका

मुंबई | Gajanan Kale On Kishori Pednekar – मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची दादर पोलिसांकडून एसआरए घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनीही त्यांच्यावर या घोट्याळ्याप्रकरणी आरोप केले आहेत. दरम्यान, यावरून आता मनसे नेते गजानन काळे यांनी किशोरी पेडणेकरांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

“मोरूच्या मावशीनं मोठाच डल्ला मारला म्हणायचं. गोरगरीब झोपडपट्टीवासीयांसाठी असलेल्या SRA योजनेत स्वत:ला घर व 6 गाळे, मांजर लपून दूध पीत होती तर. या तर मुंबई पोखरणारी घुस निघाली असं म्हणायचं का, आता चौकशी झालीच पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणातील काॅमेडी क्वीन ‘भारती सिंग'”, असं खोचक ट्विट गजानन काळे यांनी केलं आहे.

किरीट सोमय्यांनी केलेला आरोप

“भाऊबीजेला किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानतो, पण माझ्यासाठी नेहमीच राष्ट्र प्रथम आहे. किशोरी पेडणेकर यांनी अनधिकृतरित्या वरळी गोमाता जनता SRA मध्ये 6 गाळे/ सदनिका हस्तगत केल्या आहेत, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली की या सदनिकांचा ताबा घ्यावा”, अशी मागणी किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये