ताज्या बातम्यारणधुमाळी

“राम शिंदे साहेब पुड्या सोडू नका…”, रोहित पवारांचा खोचक टोला

मुंबई | Rohit Pawar On Ram Shinde – बारामती अॅग्रो साखर कारखान्याच्या गाळप हंगामावरून भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात गेल्या आठवड्यात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगलं होतं. तसंच राम शिंदेंनी कारवाईची मागणी केल्यानंतर रोहित पवारांनी हे लहान मुलांनी चाॅकलेटसाठी रडण्यासारखं आहे, असं म्हणत खोचक टोला लगावला होता. आता पुन्हा एकदा रोहित पवार आणि राम कदम यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. यंदा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावरून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केली आहे. राम शिंदेंनी यासंदर्भात केलेल्या दाव्यावर रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी राम शिंदे यांचं एक विधान दिलं आहे. “माझ्या मतदारसंघात येऊ नका म्हणून आमदार रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांना दहा फोन केले”, असं राम शिंदेंनी म्हटल्याचं रोहित पवारांनी या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

राम शिंदेंच्या या दाव्यावर रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्याला पैसा आणि अहंकाराची खाज आहे. ज्याला हाफकिन संस्था आहे की व्यक्ती हेही माहिती नाही, जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो, अशा व्यक्तीला मतदारसंघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू? राम शिंदे साहेब, पुड्या सोडू नका. खेकड्याची चाल लोक स्वीकारत नाहीत. हिंमत असेल, तर याचा पुरावा द्या आणि यापुढे तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा. मग मैदानात बघू”, असं आव्हान रोहित पवारांनी दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये