शरद पवार मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल

मुंबई | Sharad Pawar Admitted In Hospital – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल झाले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव ते रूग्णालयात दाखल झाले आहेत. शरद पवारांना डाॅक्टरांनीच रूग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले असून पुढील तीन दिवस त्यांच्यावर उपचार होणार आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी माहिती दिली आहे.
शिवाजीराव गर्जे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते रूग्णालयात दाखल झाले आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस ते उपचार घेणार आहेत. तसंच 2 नोव्हेंबरला त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल.
दरम्यान, शरद पवार 3 नोव्हेंबरला शिर्डीला जाणार आहेत. पक्षाचं दोन दिवसांचं शिबीर होणार असून त्यासाठी ते उपस्थित राहून मार्गदर्शन करतील अशी माहिती पक्षाने दिली आहे. तसंच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रूग्णालय परिसरात गर्दी करू नये असं आवाहनही करण्यात आलं आहे.