ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

आदित्य ठाकरेंनी काढली, फडणवीसांच्या पत्रकार परिषदेची हवा म्हणाले; “केंद्राकडे बोट दाखवून…”;

मुंबई : (Aaditya Thackeray On Devendra Fadnavis) आम्ही केलेल्या प्रश्नावर जे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित होतं ते उपमुख्यांनी दिलं आहे. त्यामुळे खरे अधिकार कोणाकडे आहेत ते जनतेच्या लक्षात आलं आहे. आपल्या राज्यातून 2 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक असलेले आणि जवळपास 3 लाख रोजगार निर्मिती होणारे 5 प्रकल्प बाहेर राज्यात गेले आहेत. हे प्रकल्प बाहेर गेल्यानंतर सांगण्यात आलं की, दुसरे मोठे प्रकल्प आणू. परंतु, महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पाचं गाजर दाखवलं जात आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आकड्यांचा खेळ करुन महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राज्यातून बाहेर गेलेला वेदांता फॉक्सकॉन आणि आधीचा फॉक्सकॉन प्रकल्प वेगळा असल्याचंही ते म्हणाले. राज्यातून आता बाहेर गेलेला प्रकल्प हा सेमिकंडक्टरचा असून 2020 साली बाहेर गेलेला फॉक्सकॉन प्रकल्प हा मोबाईल संबंधित होता, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “पत्रकार परिषदेत एवढं खोटं बोलल्याचं मी कधीही ऐकलं नव्हतं किंवा पत्रकार परिषदेतून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहिलं नव्हतं. देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या टीमकडून चुकीची माहिती मिळाली आहे. फडणवीसांनी उल्लेख केलेला प्रकल्प जानेवारी २०२० मध्ये महाराष्ट्रातून बाहेर गेला आहे. हा प्रकल्प २०१६ साली देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ योजनेतून महाराष्ट्रात आला होता. ही फॉक्सकॉनची कंपनी असून महाराष्ट्रात मोबाइल निर्मिती करणार होती,” अशा प्रकारे आदित्य ठाकरेंनी एकप्रकारे फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील हवाच काढून घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये