देश - विदेश

झिम्बाब्वेचा 71 धावांनी धुव्वा उडवत, भारताची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री; पाकला दणका, एक नंबर कायम!

मेलबर्न : (India Vs Zimbabwe T-20 World Cup Match)  भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव करत ग्रुप 2 च्या अव्वल स्थानावर झेप घेतली. पाकिस्तानने बांगलादेशला हरवून 6 गुण घेत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र भारताने झिम्बाब्वाचा पराभव करत आपली गादी पुन्हा मिळवली. भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताने त्यांचा डाव 115 धावात गुंडाळला. भारत आता 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. भारत आता सेमी फायनलमध्ये 10 नोव्हेंबरला इंग्लंडविरूद्ध खेळणार आहे.

पहिल्या पाॅवर प्लेमध्ये चांगली सुरुवात झाल्यानंतरही मधल्या काही षटकांत भारतीय फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. मात्र, विराट कोहली बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वे समोर 187 धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताकडून सूर्युकमारसह केएल राहुलनंही अर्धशतक ठोकलं आहे. आता 187 धावा करण्यासाठी झिम्बाब्वेचा संघ मैदानात उतरणार आहे. मात्र, या सामन्यात सुर्या पुन्हा तळपल्याचं दिसून आलं.

टी-20 विश्वचषकाचा 42 वा सामना भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुपर-12 फेरीतील हा शेवटचा सामना आहे. भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. गुणतालिकेत कमाल कामगिरीमुळे भारत आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचला होता, मात्र, अव्वल स्थान पाकिस्तान मिळावलं होतं ते भारताने हिसकावून घेतलं आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये