ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

कृषिमंत्र्याकडून बहिणीला शिवीगाळ, तरी भाऊ निद्रावस्थेत?

मुंबई : (Abdul Sattar On Supriya Sule) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार  यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादीतील प्रत्येक मंत्र्याने याचा निषेध केला. पण राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले आणि सुप्रिया सुळेंचे भाऊ म्हणून ज्यांनी संरक्षण करायचे ते अजित पवार गेली 24 तास निद्रावस्थेत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांच्याकडून अद्याप कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

अजित पवारांनी ट्विटर हॅण्डलवरुन ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत करणारं ट्वीट केलं. मात्र, सुप्रिया सुळे यांच्याबाबत घडलेल्या घटनेची कसलीच नोंद पाहायला मिळत नाही. त्यामुळे अजित पवार नेमके कुठे आहेत याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

शिर्डी येथील शिबिरात अजित पवारांची अनुपस्थिती म्हणजे दादा नाराज तर नाहीत ना, गुवाहटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून राहा रे कुछ तो गडबड है, असं ट्वीट मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केलं होतं तर दुसरीकडे शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी अजित पवार यांची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही असं म्हटलं होतं.

दिल्ली येथील अधिवेशनात अजित पवार यांची समोर आलेली नाराजी त्यानंतर पुन्हा शिर्डी येथील शिबिरातून अचानक गायब झालेले अजित पवार हे आपल्या बहिणीवर आलेल्या संकटावेळी देखील कुठेच पाहायला मिळाले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात काही गडबड तर सुरु नाही ना अशी शंका राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये