अब्दुल सत्तारांनंतर अमेय खोपकरांकडून राष्ट्रवादीला शिवीगाळ; म्हणाले, “**ची अवलाद आहेत हे राष्ट्रवादीवाले, लाज…”
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राष्ट्रवादीवर खालच्या शब्दांत टीका केली आहे. नुकतंच काल राज्याचे कृषीमंत्री शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना खालच्या शब्दांत टीका केली होती. त्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने आणि घोषणाबाजी केली. त्याचबरोबर सत्तारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील राष्ट्रवादीने केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘हर हर महादेव’ चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने ठाण्यासह अनेक चित्रपटगृहातील शो बंद पाडले. सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले आहेत. त्यात एका प्रेक्षकाला मारहाण देखील झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी शो चालवू देणार नाही म्हणून सांगितलं होतं. त्याविरोधात अमेय खोपकर यांनी शो सुरु करून राष्ट्रवादीवर संताप व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या १०,१५ लोकांनी मिळून एका प्रेक्षकाला मारहाण केली म्हणत, राष्ट्रवादीचे ***ची अवलाद असल्याचं म्हणत यांना लाज वाटली पाहिजे अशा खालच्या शब्दांत टीका केली आहे.