सामना पावसाने गेला वाहून! मालिका जिंकण्याच्या भारताच्या आशाही राहिल्या ओल्या…

हॅमिल्टन : (India vs New Zealand ODI Series 2nd Match 2022) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. मैदानावर आज सकाळपासून पाऊस पडत होता. सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस थांबला असला तरी ओल्या मैदानामुळे टॉसला उशीर झाला.
पावसाने सामन्यात प्रचंड व्यत्यय आणला. पहिल्या 4.5 षटकांनंतर पाऊस आला आणि नंतर काही तासांनंतर सामना पुन्हा सुरू झाला, जो 29-29 षटकांचा होता, परंतु 12.5 षटकांनंतर पावसाने खेळ खराब केला. पंच आणि सामनाधिकारी यांना सामना रद्द करण्यास भाग पाडले. अशा स्थितीत मालिकेचा निर्णय आता शेवटच्या सामन्याने होणार आहे.
सामना रद्द होण्यापूर्वी भारताने एक विकेट गमावून 89 धावा केल्या होत्या. शुभमन गिल 45 धावा करून नाबाद होता, तर सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 34 धावा करत गिलला साथ दिली. हा सामना रद्द झाल्यानंतर भारताला यापुढे मालिका जिंकता येणार नाही. किवी संघ 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. मालिकेतील शेवटचा सामना 30 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. त्यामुळे सामना पावसाने वाहून गेला, अन् मालिका जिंकण्याच्या अशा राहिल्या ओल्या अशी भारतीय संघाची झाली आहे.
दरम्यान, नाणेफेक जिंकत न्यूझीलंड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने सुरुतीच्या काही षटकांत धिम्या गतीने धावसंख्या करत असताना कर्णधार शिखर धवनला आवघ्या तीन धावाच्या मोबदल्यात माघारी परताव लागलं. मात्र, त्यानंतर आलेल्या सुर्याकुमार यादवने आपला फाॅम अजमावत जलद गतीने धावसंख्या केली. त्याने 25 चेंडूत 34 धावा केल्या 12.5 षटकापर्यंत भारतील संघाने 89 धावा बोर्डवर लावल्या.